तुम्हाला पण सोने खरेदी करायचे आहे? जाणुन घ्या आजचा दर

सोने -चांदी : आता दिवाळी संपली आणि लग्नसराईला सुरवात झाली आहे.आणि सोने खरेदी करण्याकडे नागरी जास्त प्रमाणात भर देतात,अश्यातच मागील वर्ष्याच्या तुलनेत या वर्षी देखाली सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणत झाली आहे. यामुळे नागरिकांना कडून नाराजकी व्यक्त होत आहे.हि दर वाढ आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ऐन सणासुदीच्या काळात सोने चांदी महागल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. परंतु नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला यात काहीसा किंचित दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यात पण सोन्यात चांगलीच घसरण झाली होती. 14 नोव्हेंबर रोजी सोन्यात 110 रुपयांची दरवाढ झाली. 15 नोव्हेंबर रोजी सोन्याने 400 रुपयांची दरवाढ नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गेल्या आठवड्यात चांदीत चढउताराचे सत्र होते. 11 नोव्हेंबर रोजी एक हजारांची घसरण झाली होती. या आठवड्यात सोमवारी किंमती 600 रुपयांनी घसरल्या होत्या. तर मंगळवारी 15 नोव्हेंबर रोजी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. 16 नोव्हेंबर रोजी किंमती 1700 रुपयांनी वाढल्याचा दावा गुडरिटर्न्सने केला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.