जळगाव : व्हॉट्सअॅप गृपवरुन आम्हाला का? कमी केलें. तसेच विचारणा का ? केली अशी विचारणा करीत दोघांनी एकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. भातखेडे खुर्द ता. पाचोरा येथे शेत शिवारात ही घटना बुधवार, ८ रोजी संध्याकाळी घडली. याप्रकरणी बुधवार, १५ रोजी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. वसंत भगवान कुमावत ( वय ४२, रा. भातखंडे) हे त्यांच्या शेतात काम करत होते.
याठिकाणी सागर कुमावत तसेच चंद्रकात कुमावत रा. भातखंडे हे दोघे बंधू आले. तू आम्हाला भातखंडे कुमावत व्हॉट्सअॅप गृपवरुन का? कमी केले व का विचारणा केली, अशी विचारणा केली. याबद्दल वसंत कुमावत हे सजविण्यास गेले असत सागर कुमावतने हातातील कुऱ्हाडीने वार केला.
त्यानंतर शिवीगाळ करत त्यांना खाली पाडले. चंद्रकात कुमावत याने हातातील लाकडी दांडक्याने डोक्यात, पाठीवर बेदम मारहाण केली. चापटा बुक्क्यांनी मारहाण करत वसंत कुमावत यांना धमकाविले. याप्रकरणी तक्रारीनुसार पाचोरा पोलीस ठाण्यात दोघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक तुषार विसपुते हे करीत आहेत.