सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ जगांसाठी आहे पदभरती, आताच करा अर्ज

तुम्हीपण नोकरीच्या शोधामध्ये असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 3000 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे.  या भरती प्रक्रियेची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. Central Bank of India Apprentice Bharti या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 06 मार्च 2024 आहे.

अर्ज फी: सामान्य, ओबीसी श्रेणीसाठी रु 800, SC, ST EWS श्रेणीसाठी रु 600, PH उमेदवारांसाठी रु 400 आणि सर्व महिला उमेदवारांसाठी रु 600.

अर्ज कसा करायचा
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवार NATS मध्ये जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने भरता येतो. तुम्हाला अर्जासोबत विहित शुल्क जमा करावे लागेल, तरच तुमचा फॉर्म स्वीकारला जाईल.

कोण अर्ज करू शकतो?
या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]