जळगाव: मार्च महिन्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठयाप्रमाणात चढउतार झाल्याचे पाहिला मिळले मागच्या महिन्यात सोन्याचे भाव ६६ हजार रुपयांवर गेला. दुसरीकडे चांदीने देखील मोठी उसळी घेत ७६००० हजार रुपयाचा टप्पा गाठला.जळगावच्या सराफ बाजारात आजच दर सकाळच्या सत्रात चांदीच्या दर ७५००० हजार रुपयावर आला. चांदीत एक हजार रुपयाची घसरण दिसून आली. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात १०० रुपयाची घसरण दिसून आली. सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६०,२६० रुपये प्रति तोळ्यावर आहे तर २२ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ६५,८०० रुपये प्रति तोळा इतका आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा दर
सोन्याच्या फ्युचर किमतीत आज नरमाई दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर २८७ रुपयाने घसरून ६५,२५५ रुपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरुवातीला सततच्या तेजीच्या बळावर सोन्याचे वायदे ६६,३५६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या सर्वोच्च उच्चांकावर पोहोचले होते. दुसरीकडे MCX वर चांदीचा भाव ३५० रुपयांनी घसरला असून ७५३०० रुपयावर ट्रेंड करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चांदीचा भाव ७८,५४९ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. अशाप्रकारे, उच्चांकावरून प्रति किलो चांदी तीन हजार रुपये स्वस्त खरेदीसाठी उपलब्ध आहे.