तुम्हीही पण जनधन खातेधारक आहात का? तर तुमच्यासाठी आहेत 1.3 लाख रुपयांची सुविधा

जन धन: तुम्हीपण जन धन खाते वापरत असाल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी आहे खास जनधन खातेदारांना अनेक सुविधांचा लाभ दिला जात आहे.जन धन खात्यावर रुपे डेबिट कार्ड व्यतिरिक्त खातेदाराला 1 लाख रुपयांचा विमा दिला जातो. जानेवारी २०२२ च्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत जन धन योजनेअंतर्गत देशात एकूण ४४.२३ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.

जन धन खात्याचा लाभ कार्डधारकांनाच मिळू शकतात
जन धन खात्यावर उपलब्ध सुविधांचा लाभ फक्त त्याच कार्डधारकांनाच मिळू शकतात. ज्यांनी आपले खाते हे आधारशी जोडले आहे. जर कोणी अद्याप खाते खात्याशी लिंक केले नसेल तर ते त्वरित पूर्ण करा. नाही तर तुम्हाला सुविधा मिळणार नाही.आम्ही तुम्हाला माहिती देतो कि हे कार्ड 1 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण प्रदान करते. परंतु, खातेधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीने जर त्याचे खाते आधार कार्डशी लिंक केले असेल तरच त्याला या विमा संरक्षणाचा लाभ मिळू शकतो. डेबिट कार्ड व्यतिरिक्त, खातेदाराला 30 हजार रुपयांच्या वेगळ्या अपघाती मृत्यू विम्याचा लाभ देखील मिळतो.

अश्या प्रकारे करा आधार लिंकिंग
तुमचे जन धन खाते अद्याप आधारशी लिंक केलेले नसेल, तर आधार कार्डची फोटो कॉपी सोबत ठेवा. येथे तुम्हाला दोन लिंक करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. यानंतर बँक तुमचे आधार कार्ड आणि जन धन खाते लिंक करेल. याशिवाय तुम्ही मोबाईल एसएमएसद्वारेही लिंक करू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून एसएमएस पाठवा. यासाठी, त्यानंतर तुमचे आधार आणि जनधन खाते लिंक केले जाईल.