”तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला”, उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

by team

---Advertisement---

 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्‍टेंबर २०२३ मध्‍ये सनातन धर्म निर्मूलनाचे आवाहन करत आक्षेपार्ह टिप्‍पणी केली होती. यावेळी त्‍यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना आणि मलेरिया या रोगांशी केली होती. यानंतर त्यांच्यावर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

त्‍यांच्‍यावर कारवाईची मागणी करणार्‍या याचिकेवर आज सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांच्‍या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्‍तीवाद केला. तसेच या प्रकरणी विविध ठिकाणी दाखल झालेल्‍या गुन्‍ह्यांची एकत्र सुनावणी व्‍हावी, अशी मागणी त्‍यांनी केली.

यावेळी सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले की, “उदयनिधी स्‍टॅलिन हे एका राज्‍यातील मंत्री आहेत. सामान्य माणूस नाही. तुम्ही काय बोललात ते तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला त्याचे परिणाम जाणवायला हवे होते. तुम्‍ही तुमच्‍या अधिकारांचा गैरवापर केला आहे.” अश्या शब्दात न्यायालायने स्टॅलिन यांना फटकारले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---