तुम्ही काढले का ‘हे’ कार्ड ? धुळ्यातील सात लाख नागरिक घेणार आता ‘या’ योजनेचा लाभ

धुळे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावे, यासाठी केंद्र सरकारने ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ चालू केली आहे. या योजजनेचा लाभ हा कोट्यवधी नागरिक घेत आहेत. या योजने अंतर्गत लाभार्थ्याला ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. केंद्राने २०१८ पासून या योजनेला सुरुवात केली असून, आतापर्यंत जिल्ह्यात सात लाखांच्या घरात नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढले असल्याची माहिती जिल्हा समन्वयकांतर्फे देण्यात आली.

आयुष्मान भारत योजनेमधून अंगीकृत रुग्णालयात नागरिकांवर पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यसाठी आयुष्मान कार्ड काढणे गरजेचे आहे.जिल्ह्यात या योजनेचे १५ लाख ६८ हजार ४०१ लाभार्थी असून, यापैकी ६ लाख ९२ हजार ६८२ नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड काढले असल्याचे सांगण्यात आले.

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना या केंद्र पुरस्कृत आहेत. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशनअंतर्गत सन २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात आली आहे.