पाचोरा: तालुक्यातील नगरदेवळा येथील माहेर तर पाचोरा येथील सासर असलेल्या 23 वर्षीय विवाहितेस सासरच्या मंडळींकडून तु सुंदर नाही आम्हाला आवडत नाही व माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे, अशी मागणी करीत शारिरीक व मानसिक छळकेल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात आरोपी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 जानेवारी 2023 रोजी नगरदेवळा येथील महिलेचे लग्न झाल्यानंतर सुमारे 10 ते 15 दिवसापासून ते मे – 2023 पावेतो वेळोवेळी हिरवेनगर वडाळा रोड नाशिक व नगरदेवळा येथे फिर्यादी व आरोपीच्या राहत्या घरी फिर्यादी विवाहितेस आरोपींनी तु सुंदर नाहीस आम्हाला आवडत नाही व माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे याकारणावरुन पती यांनी महिलेस शिवीगाळ करुन चापटाबुक्कांनी मारहाण केली व सासरचे इतर 6 मंडळींनी शिवीगाळ करुन विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केला व नगरदेवळा ता.पाचोरा येथे पती, सासरे व सासू यांनी येऊन शिवीगाळ करुन जर माहेरुन फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणले नाही तर तुला नांदविणार नाही अशी धमकी दिली अशी फिर्याद विवाहितेने पाचोरा पोलिसात दाखल केली. याप्रकरणी आरोपी पतीसह सात जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मोरे (महाराज) हे करीत आहेत.