---Advertisement---

तू तुझ्या घरी जा, मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत; संशयिताने थेट…

---Advertisement---

Crime News : विवाहित पुरूषासोबत राहण्याचा हट्ट केल्याने 40 वर्षीय महिलेच्या गळ्यावर ब्लेड मारून वा तिला विहिरीत ढकलण्यात आल्याने महिलेचा मृत्यू झाला.  या प्रकरणी फैजपूर पोलिसात एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयिताला अटक करण्यात आली.  खुमसिंग सरदार बारेला (33, मूळ रा.खिरवड, ता.रावेर, ह.मु.मोर धरणाजवळ, हिंगोणा, ता.यावल) असे संशयिताचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 40 वर्षीय महिला संशयीताकडे घरी आली व त्यावेळी महिलेने त्याच्या घरी राहण्याचा हट्ट केला. त्यावर तु तुझ्या घरी निघून जा, तुझ्यामुळे माझा संसार खराब होईल, असे त्याने तिला म्हटले होते मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयिताने त्याच्याकडे असलेल्या धारदार ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले वा  नंतर तिला विहिरीत ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment