तृतीयपंथीसाठी एक दिवसीय कार्यशाळा ; शासनाच्या विविध योजनांची दिली माहिती

जळगाव : जिल्ह्यातील तृतीयपंथी समुदायाला आरोग्य सेवेसोबतच त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या सामाजिक सेवा, सुविधा व विविध योजना तसेच कायदेविषयक, माहिती व मार्गदर्शन तृतीयपंथी समुदायाला मिळावे याकरिता प्लॅन इंटरनॅशनल(इंडिया चॅप्टर)तर्फे तृतीयपंथी समुदायासाठी एक दिवसीय मार्गदर्शनपर कार्यशाळा नुकतीच पार पडली.
प्लॅन इंटरनॅशनल(इंडिया चॅप्टर) तर्फे तृतीयपंथी समुदायाकरीता अनुदान अंतर्गत राष्ट्रीय प्रतिसादाला गती देण्याच्या दिशेने जे जोखीम असलेल्या समुदायामध्ये जलद-मार्गाने 95-95-95 लक्ष्य साध्य करण्यासाठी कार्य करत आहे. अर्पण- वन स्टॉप सेंटर हे विशेषत: व्यक्ती-केंद्रित आणि संसाधन-प्रभावी दृष्टीकोन म्हणून डिझाइन केले गेले आहे, जेणेकरुन इंटिग्रेटेड प्रिव्हेंशन – केअर कॅस्केड सर्विसेस जोखीम असलेल्या हार्ड-टू-रीच समुदाय विशेषतः ट्रान्सजेंडर व्यक्ती जे अजूनही राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हस्तक्षेपांच्या आवाक्याबाहेर आहेत. अर्पण – समुदाय सुरक्षा केंद्र (वन स्टॉप सेन्टर) अंतर्गत सप्टेंबर 2022 पासून जळगाव जिल्ह्यात आवश्यक सेवा -सुविधा मिळवून देण्याकरिता कार्य करत आहोत,
जळगाव येथे झालेल्या कार्यशाळेत भारती भालेराव यांनी मार्गदर्शन केले.

तृतीयपंथीयांसाठी समाजकल्याण विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, शासनाकडून देण्यात येणारे पेन्शन विविध योजनांची महिती दिली. तसेच डॉ. ऊबर खान व डॉ. सोनाली साळुंके यांनी तृतीयपंथी यांना टफ अप तसेच लेजर थेरपी विषयी माहिती तसेच या लाभार्थ्याना यासुविधा कमीतकमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगीतले.
जिल्हा सामान्य रुग्णालय जळगांव येथील जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी तपासणीचे महत्त्व सांगत आरोग्य तपासण्या करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी भरत गुरू यांनी समर्थ व सक्षमपणे आपल्यावर येणाऱ्या संकटाना सामारे जाण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विविध ठिकाणचे 28 तृतीयपंथी सहभागी झाले होते.
वेशभूषा व मेहंदी स्पर्धा, विजेत्यांना बक्षीस वाटप
मेहेंदी व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व त्यामध्यें जे स्पर्धक विजयी झाले त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितण करण्यात आले. या कार्यक्रमाला हितेंद्र धांडे, योगेश जोशी, राजेंद्र कानडे (जाहिरात विभाग) प्लॅन इंटरनॅशनल सेंटर मॅनेजर अल्केश वाघरे, मोहन महाजन, पियूष चौधरी, ओ आर डब्ल्यू म्हणून संकेत वारुळकर व संतोष सपकाळे यांनी परिश्रम घेतले