तेव्हा मी गुरुजी होऊ शकलो नाही मात्र आज जिल्ह्याचा: पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगाव /जळगाव : व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेहसंमेलन अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा. हे व्यासपीठ म्हणजे विद्याथ्यांच्या अंगभूत कलाविष्कारासाठी प्राप्त झालेली एक संधी आहे. विविध शैक्षणिक उपक्रम ांमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे गुण स्नेहसंमेलनामध्येच विकसित होत असतात. लहानपणी माझे वकृत्त्वही चांगले होते. त्यामुळे मी राजकारणाच्या शाळेत आलो. तेव्हा मी गुरुजी होऊ शकलो नाही; मात्र आज जिल्ह्याचा पालकमंत्री असून समाधानी आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध कलागुण जोपासावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांपुढे बोलताना केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी.जी. पाटील होते.

धरणगाव येथिल पू.गो.गं. वाजपेयी गुरुजी शिक्षण सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रा. व्ही. जी. पाटील प्राथमिक विद्यामंदिर, इंदिरा गांधी म ाध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.पालकमंत्र्यांनी दिली बोर्डात प्रथम क्रमांक मिळविलेल्या चेतना पोतकर हिला अॅक्टिवा भेट गेल्या वर्षीही दिली होती अॅक्टिवा भेट

इंदिरा कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी चेतना पुरुषोत्तम पोतकर ही ९६ टक्के गुण प्राप्त करून दहावीत प्रथम आल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे अॅक्टिवा मोटारसायकल देण्यात भेट म्हणून देण्यात आली. दरवर्षी ना. गुलाबराव पाटील हे प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला स्कुटी किंवा अॅक्टिवा मोटरसायकल देत असतात. यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. त्यामुळे पालकांनी ना. गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही याच शाळेतील पूर्वा विनोद पाटील हिने ९६ टक्के गुण प्राप्त करून दहावीत प्रथम आल्याबद्दल पालकमंत्र्यांनी अॅक्टिवा मोटर सायकल दिली होती.यात प्रथम आलेल्या, जिल्हास्तरावर वकृत्व स्पर्धेत तसेच बोर्डात दहावी, बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना, शालेय निबंध, चित्रकला व क्रीडा स्पर्धेआला.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी गायले ‘ कभी कभी’ चित्रपटातील गाणे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथिल शाळेच्या स्नेसंमेलनात ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’ या गाण्याचे बोल म्हटले. यावेळी उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
यांची होती