तैयब खानने केले ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतर; ‘हर्षिता’ झाली ‘हानिया’

लखनऊ : उत्तर प्रदेशातील गाझियाबादप्रमाणेच आता राजस्थानमध्येही ऑनलाइन गेमद्वारे धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. अलिगढचा तैयब खान फ्री फायर गेमद्वारे सीकरमधील एका हिंदू महिलेच्या संपर्कात आला. त्यानंतर तिचे ब्रेनवॉश करून धर्मांतर करण्यात आले. यानंतर पीडितेने सिंदूर आणि बिंदी लावणे बंद केले. ती नमाज अदा करू लागली. तसेच तिचे हर्षिता हे नाव बदलून हानिया ठेवण्यात आले.

हे प्रकरण राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील सदर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. धर्मांतर झालेल्या पीडितेचा पती हा परदेशात राहतो. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी पीडित महिला ऑनलाइन गेम खेळायची. फ्री फायर गेम खेळत असताना पीडितेने लव्ह लाईफ नावाच्या ग्रुपमध्ये जॉईंड झाली. या गटात तिची ओळख अलीगढ येथील तैयब खान याच्याशी झाली. सुरुवातीच्या संभाषणानंतर दोघांनी इंस्टाग्रामवर तासनतास चॅटिंग सुरू केलेदरम्यान, तैयबने हर्षिताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगण्यास सुरुवात केली. त्याने हर्षिताला नमाज अदा करायला शिकवले. इस्लामबद्दल बोलून हर्षिताचे ब्रेनवॉश तैयब करत असतं. त्याच्या बोलण्याने प्रभावित होऊन हर्षिताने बुरख्यासारखे दिसणारे गाऊन विकत घेतले.

हर्षिताच्या घरच्यांना तिच्या या वागण्याबद्दल माहिती नव्हती. एके दिवशी त्याच्या भावाला कपड्यांमध्ये बुरखा दिसला तेव्हा त्याला संशय आला. तेव्हा हर्षितानेही बिंदी आणि सिंदूर लावणं बंद केल्यांच कुंटूबियांच्या लक्षात आलं. ती आपल्या मुलांबद्दल ही बेफिकीर बनली होती. यानंतर भावाने हर्षिताचा मोबाईल तपासला असता त्यात इस्लामशी संबंधित गोष्टी आढळून आल्या. घरच्यांच्या समजूतीवर हर्षिताने सगळ्यांना ओरडायला सुरुवात केली. आणि इस्लाम स्विकारणार असल्याचे सांगितले.

पीडित हर्षिताचे म्हणणे आहे की, इस्लाम न स्वीकारल्यास तैयब खान तिला आत्महत्या करण्याची धमकी देत ​​होता. त्याने तिचे ब्रेनवॉश केले आणि तिच्या आधारकार्डचा फोटोही काढला. जेव्हा हर्षिताने तैयबला आधार कार्ड मागितले तेव्हा त्याने ते देण्यास नकार दिला. हर्षिताच्या भावाने तैयब खान आणि त्याचा साथीदार साबीर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपींचे मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.