जळगाव : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत “माझ्याशी बोल” म्हणत विनयभंग केला. अमळनेर शहरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी वास्तव्याला असून, शहरातील एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून अतुल सुधाकर पाटील हा तिचा पाठलाग करत होता. शिवाय त्याने तिचा हात पकडून तिला गाडीवर बसवून नेले. माझ्याशी बोलत जा नाहीतर मी तुझा असाच पाठलाग करेल असा दम देऊन विनयभंग केला.
दरम्यान, अल्पवयीन मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. पिडीत मुलीसह नातेवाईकांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी अतुल सुधाकर पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहे.