.. त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी लहानपणीचा ‘तो’ किस्सा सांगितला?

जळगाव । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात संभाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी बालपणीचा एक किस्सा सांगितला. तसेच यावेळी त्यांनी त्यांचे राजकीय विरोधक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.

“सायकलीची मला पण लहानपणी आवड होती. एकदा भाड्याने सायकल घेतली. 50 पैसे तेव्हा भाडं होतं. अर्ध्या तासाचं भाडं होतं. मात्र मी एकटाच सायकल फिरवली आणि 25 पैसे दिले. त्यामुळे सायकलवाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली आणि माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं. तो मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो ही हीच मोठी आनंदाची बाब आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव देवकारांवर हल्ला :
यावेळी मंत्री गुलाबराव पाटीलांनी गुलाबराव देवकरांवर टीका केली. बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. कपाळ करंट्यानहो तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा, दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो”, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला.