जळगाव : भरधाव वेगात कारने शहरात प्रवेश केला. रस्त्याच्याकडेला वाँकींग करत चालत जात असलेल्या नागरिकाला या कारने मागवून धडक दिली. त्यानंतर चालकाने सुसाट वेगात कार पळविली. गुरूवार ४ रोजी पहा ५.२५ वाजता ही घटना शिवाजीनगरात कानळदा रोडवरील रेणुकामाता मंदीराजवळ लाकूडपेठ परिसरात घडली. या अपघातात सुधीर उत्तम सोनवणे (४५) रा. गेंदालाल मिल हे जखमी झाले. सुधीर सोनवणे हे पेंटर असून ते या कामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
गुरुवारी पहाटे सुधीर हे तसेच त्यांचे मित्र अरुण निकम असे दोघे जण नेहमीप्रमाणे कानळदा रोडवर पायी वॉकींग करत होते. त्याचवेळी कानळदा गावाकडून भरधाव वेगातील पांढरी कार चालक शहरात आणत होता. शहरात प्रवेश केल्यानंतर चालकाने कारख नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना चालकाने वेगाची गती कायम ठेवत मागवून पेंटर सोनवणे यांना धडक दिली. खाली पडून त्यांच्या डोक्याला, पायाला, चेहऱ्यास गंभीर दुखापत झाली. धडक दिलेला व्यक्ती जखमी झाला हे माहित असताना चालक शहराकडे वेगात पसार झाला. त्याने घटनेची माहिती पोलिसांनाही दिली नाही. जखमी पेंटरच्या मदतीला त्यांचे मित्र अरुर निकम धावले. त्यांनी इतरांच्या मदतीने त्यांना वाहनातून रुग्णालयात हलविते त्यांच्यावर त्यामुळे तत्काळ उपचार सुरु झाले. याप्रकरणी सोनवणे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. तपास सफौ संजय झाल्टे करत आहेत.