महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल नुकताच जाहीर केला.याप्रसंगी मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, सहसचिव माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आली होती.
यात कोकण विभागातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ९९.०१ आहे. तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा निकाल ९४.७३.टक्के लागला आहे.