दारुची बाटली न दिल्याने हॉटेल मॅनेजरला मारहाण, परस्पर तक्रारीवरुन पाच जणांविरुध्द गुन्हा

जळगाव : नाईन्टी (90 एमएल) दारु मागत 500 रुपयांची नोट मद्यपीने काढली. सुटे पैसे नसल्याने त्याला दारूदिली नाही. याचा राग येवून दोघांनी हॉटेल मॅनेजरला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवार 29 रोजी रात्री 10.40 वाजता खोटेनगर स्टॉपजवळ  घडली. याप्रकरणी  तालुका पोलीस ठाण्यात शनिवार 30 रोजी दोघां वरुध्द गुन्हा दाखल झाला. मद्य न देता  काही कारण नसताना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला.सुखदेव रात्री पर्ल-इन बियरबारमध्ये आला. नाईन्टी दारुची क्वॉर्टर मागत 500 रुपयांची त्यांनी नोट काढली. मात्र सुटे नसल्याचे सांगत हॉटेल मॅनेजर दिनेश यानी दारू देण्यास नकार दिला.

रात्री 10.40 वाजेच्या सुमारास मॅनेजर दिनेश हे खोटेनगर स्टॉपजवळ आले. सुखदेव चौधरी तसेच प्रफुल्ल पाटील या दोघांनी दिनेश यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. गुलाब पाटील (43) रा. श्रीराम समर्थ कॉलनी तसेच त्यांचे बंधू ज्ञानेश्वर  असे दोघे बंधू हे भांडण सोडविण्यासाठी धाऊन गेले. मात्र ज्ञानेश्वर यांचे दोन्ही हात प्रफुल्ल पाटील यांनी मागून धरुन ठेवले. सुखदेव चौधरी याने हातातील लाकडी मोगरी मारल्याने ज्ञानेश्वर यांच्या डोळ्याला दुखापत झाली.

याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. तर  दारू न दिल्याने तसेच काही एक कारण नसताना रोडवर खाली पाडून तिघांनी पायातील चपलेने तसेच बुटांनी डोक्यावर, तोंडावर, डोळ्याजवळ मारहाण करुन गंभीर दुखापत केली, अशी तक्रार  सुखदेव चौधरी यांनी केल्याने दिनेश लाकरा, ज्ञानेश्वर पाटील, गुलाब पाटील यांच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोहेकॉ अनिल मोरे करत आहेत.