सातारा : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस म्हणजे सतारकरांसाठी जणू एक उत्सवच,अशा या दिलदार नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून लगबग सुरू आहे. त्यानिमित्त त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जलमंदिर’ या त्यांच्या निवास्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भवानीमाता मंदिरात महापूजा केली. नंतर त्यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज आनंदाचा दिवस आहे. उदयनराजे कायम उत्साहात असतात. दिलखुलास, मोकळ्या मनाचा माणूस म्हणून राजेंची ओळख आहे, असे ते म्हणाले
मराठा आरक्षण प्रक्रियेत राजे अग्रभागी होते. आरक्षण देण्याची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण केली. काहीजण म्हणतात आरक्षण टिकणार नाही, पण ते का टिकणार नाही हे कुणी सांगत नाही. ज्यावेळी सत्ता होती त्यावेळी काहींनी आरक्षण दिले नाही, असे म्हणत मराठा आरक्षणावरून होत असलेल्या टीकेला देखील एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.