दिलासा ! केळी उत्पादकांना हेक्टरी ३६ हजारांप्रमाणे भरपाई मिळणार

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील ७५ महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान ४२ डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला अधिक तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादक संकटात सापडले होते मात्र केळी उत्पाद‌कांना झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीकडून आता भरपाई दिली जाणार आहे. कमी तापम ानासाठी किमान २६ हजार ५०० तर अधिक तापमानासाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी लाभ मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

काय आहेत निकष..
■ फळ पीक विमा काढलेल्या
केळी उत्पादकांना जास्त व कमी तापमानामुळे केळीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.
■ १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सलग ३ दिवस पारा ८ अंश किंवा त्यापेक्षा कमी वर गेला, हेक्टरी २६ हजार ५०० रुपयांची भरपाई मिळते.
■ सलग पाच दिवस पारा ४२ अंशाच्या पुढे राहिला तर ३६ हजार रुपयांची भरपाई मिळते.
मार्च व एप्रिल महिन्यात
■ मे महिन्यात सलग तीन
दिवस पारा ४५ अंशाच्या पुढे राहिला तर ४४ हजार रुपयांची भरपाई मिळते