भुसावळ : दिवाळी आणि छटपूजा सणामुळे रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी पाहता 26 उत्सव विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या असून या गाड्यांच्या 70 फेऱ्या होणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय यामुळे दूर होणार आहे. सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहे. यात वलसाड-दानापूर ही साप्ताहिक विशेष गाडीच्या 16 फेऱ्या होतील. 09025 विशेष गाडी 6 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या काळात चाठ फेऱ्या होतील.
दर सोमवारी सकाळी 8.40 वाजता वलसाड येथून सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पोहोचेल. 09026 विशेष गाडी 7 नोव्हेबर ते 26 डिसेंबर या काळात 8 फेऱ्या करणार आहे. ही गाडी दर मंगळवारी दुपारी 2.30 वाजता दानापूर येथून सुटेल आणि वलसाड येथे दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता पोहोचेल. या गाडीला वलसाड, भेस्तान, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडीत दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर येथे थांबा देण्यात आला आहे.पुणे-हटिया 10 फेऱ्या मध्य रेल्वेच्या पुणे स्टेशनवरून पुणे-हटिया दरम्यान 10 जादा साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या होणार आहे. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. पुणे-हटिया साप्ताहिक फेऱ्या विशेष गाडीच्या 10 फेऱ्या होतील.
या गाडीला 20 एलएचबी डबे जोडलेले असतील. 02845 साप्ताहिक उत्सव विशेष गाडी पुणे येथून दर शुक्रवारी 3 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या काळात 5 फेऱ्या करेल. ही गाडी पुण्यातून सकाळी 10.45 वाजता निघेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3.25 वाजता पोहोचेल. 02846 साप्ताहिक उत्सव विशेष गाडी 1 ते 29 नोव्हेंबर पाच फेऱ्या करणार आहे. दर बुधवारी रात्री 9.30 वाजता हटिया येथून सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी पहाटे 2.45 वाजता पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउरकेला येथे थांबा देण्यात आला आहे.