मानवी मेंदूमध्ये चिप बसवण्याची (प्रत्यारोपण) पहिली चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा अब्जाधीश एलन मस्क यांनी केली आहे. मस्क यांची कंपनी न्युरालिंकने मानवी मेंदूमध्ये चिप प्रत्यारोपणाची चाचणी सुरू केली होती. ज्या व्यक्तीच्या मेंदूत चिप बसवली,त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मस्क यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर करून दिली. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने मानवी मेंदूमध्ये चिपचे प्रत्यारोपण करण्यासाठी न्युरालिंकला मे २०२३ मध्ये मान्यता दिली होती. अर्धांगवायू झालेल्या रुग्णावर चाचणी घेण्याची त्यांना परवानगी मिळाली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर मस्क यांनी म्हटले की, या चाचणीचे सुरुवातीचे निकाल खूपच उत्साहवर्धक आहेत.
न्युरालिंकच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्र संस्थात्मक पुनरावलोकन मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. पीआरआयएमई (प्रिसाईज रोबोटिकली इम्प्लांटेड ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस) या वैद्यकीय उपकरणाची चाचणी, ज्यात वायरलेस ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसची चाचणी घेण्यात आली होती, ती यशस्वी झाली. या चाचणीचा उद्देश मानवी मेंदूत चिप बसवण्याच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे हा होता.
चालणे, बोलणे किंवा पाहू न शकणारे दिव्यांग लोक पुन्हा काही प्रमाणात चांगले जीवन जगू शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रयोगशाळेत प्राण्यांवर चिप चाचणी करण्यात आल्याने कंपनीवर जोरदार टीकाही झाली होती तसेच २०२२ मध्ये अमेरिकेच्या केंद्रीय चौकशीलाही सामोरे जावे लागले होते. चाचणी दरम्यान कंपनीने १५०० प्राणी मारल्याचा आरोप आहे. मात्र, कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते.
दिव्यांगासाठी महत्त्वपूर्ण संशोधन
एलन मस्क, काही शास्त्रज्ञ आणि अभियंते यांनी २०१६ मध्ये सुरू केलेले एक स्टार्टअप अशी न्युरालिंक कंपनीची ओळख आहे. ही कंपनी ब्रेन चिप इंटरफेस तयार करण्याचे काम करते. न्यूरॉन्स सेल्स हे इलेक्ट्रिकल आणि केमिकल सिग्नलचा वापर करून मेंदू आणि शरीरात पोहोचवत असतात. या चिपचे मानवी कवटीत रोपण केले जाऊ शकते. चिप्सच्या मदतीने