दीपिका पदुकोणन चा फायटर 2024 मध्ये या तारखेला थिएटरमध्ये होणार दाखल

मुंबई : दीपिका पदुकोणने 2023 मध्ये ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आणि बरीच प्रशंसा मिळवली. शाहरुख खानसोबत ॲक्शन मोडमध्ये दिसलेली दीपिका पुन्हा एकदा वेगळ्या अवतारात पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपिका पदुकोणचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘फायटर’ पुढील वर्षी मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून लोक या चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

अलीकडेच ‘फाइटर’ चित्रपटातील अभिनेता हृतिक रोशनचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. हृतिकचा पायलट अवतार पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. हृतिक रोशननंतर दीपिका पदुकोणचा ‘फायटर’ चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर करण्यात आला असून तिच्या व्यक्तिरेखेचे ​​अनावरण करण्यात आले आहे. पायलटच्या भूमिकेत दीपिका कमालीची दिसत आहे. खाकी गणवेशातील चष्मा घातलेला दीपिकाचा इंटेन्स लुक चाहत्यांची मने कण्यासाठी पुरेसा आहे.चित्रपटात, अभिनेत्री स्क्वॉड्रन लीडर मीनल राठोडची भूमिका साकारणार आहे, जिचे टोपणनाव मिनी आहे. ती हृतिकसोबत एअर ड्रॅगन युनिटमध्ये असेल. ‘फाइटर’चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या बिग बजेट चित्रपटाचा टीझर लवकरच येण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.