दुचाकी-बसचा अपघात, वृद्धाचा मृत्यू, तरुण गंभीर

जळगाव : एसटी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार, तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आलीय. तरुणाची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. निंबा भिवसन कोळी (६०) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलीस सूत्रानुसार, निंबा भिवसन कोळी (६०) रा. गुढे ता,भडगाव व प्रसाद रवींद्र चौधरी (१६) रा. पिलखोड ता, चाळीसगांव हे दोघे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकीस्वार गाडी नंबर एम. एच.१९ ऐ.एफ.३१२८ ने गोंडगावकडून कजगावकडे येत असताना पुणे एरंडोल कजगावकडून भडगावकडे जाणाऱ्या एस. टी. बस क्रमांक एम.एच .२० बी.एल.२६५२ ची समोरासमोर धडक झाली.

यात  दोन्ही दुचाकीस्वार हे गंभीर जखमी झाले होते . त्यांना ग्रामस्थ व नातेवाईकांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले . मात्र निंबा कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना धुळे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर अपघातातील तरुणाची ही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

पारोळा चौफुलीवर हा अपघात झाला होता. या अपघातामुळे काही वेळ वाहतूकीची कोंडी झाली होती. तर अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले.