---Advertisement---

दुर्दैवी ! क्लासेसला निघाली विद्यार्थिनी; रस्त्यात… नंदुरबारातील घटनेनं हळहळ

---Advertisement---

नंदुरबार : शहारातील धुळे चौफुली येथे अव्वल गाजी दर्गा समोर भरधाव डंपरने एका १० वीच्या विद्यार्थीनीला चिरडले. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. डिम्पल सतीश पाटील (१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी डंपर चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

नंदुरबार शहारातील धुळे चौफुली येथे अव्वल गाजी दर्गा समोर रोडवर डिम्पल ही विद्यार्थिनी सायकलने क्लासेसला जात होती. दरम्यान, हायवा डम्पर (क्र. जी. जे 16 ए. डब्ल्यु 6688) चालक विनयकुमार रामचंद्र प्रसाद (40) रा. अमरा पोस्ट औरंगाबाद सरैय्या जि. रोहतास (बिहार राज्य) याने त्याचे ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालविला.

दरम्यान, डिम्पलच्या साईकला जोराची ठोस मारल्याने ती रस्त्यावर कोसळली. यामध्ये हायवा डंम्परचे क्लिनर साईटचे पुढील चाक जाऊन तिचे पोटास, पाठीस, हातास पायांना गंभीर दुखापती केली. तात्काळ अॅम्ब्युलन्सने डिम्पल हिस रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषीत केले.

याप्रकरणी सतीष आनंदा पाटील वय 45 वर्षे, धंदा भाजीपाला विक्री रा. लिंबेल ता. जि. नंदुरबार ह.मु. नेहा पार्क यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार  पोलीसांनी डम्पर चालकास ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मसपोनि नंदा पाटील ह्या करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment