---Advertisement---

दुर्दैवी ! बाजार करून घरी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; बाप-लेकाचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव : रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकून बाप-लेकाचा मृत्यू, तर पत्नी गंभीर जखमी झाली.  चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ ही घटना घडली. मोतीराम पावरा (४५), मुलगा विकी पावरा (१०) असे मृत बाप-लेकाचे नाव आहे.

चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे सालदार म्हणून काम करणारा मोतीराम पावरा (४५) हे पत्नी, मुलगा व मुलीसह शेतातच वास्तव्यास आहेत. ते मध्य प्रदेशातील सेंधवा येथील मूळ रहिवाशी आहेत.

दरम्यान, पावरा ते पत्नी व मुलांना घेऊन बाजारात गेले होते. खरेदी झाल्यानंतर दुचाकीने आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकी धडकली. यात मोतीराम पावरा (४५), मुलगा विकी पावरा (१०) या बाप-लेकाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवर असलेली मोतीराम यांची पत्नी रायाबाई पावरा (४०) गंभीररीत्या जखमी झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका बोलावून जखमी महिलेला धुळे येथे रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी येथील सहाय्यक निरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह भूषण बाविस्कर, राकेश काळे यांनी जाऊन वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृत मोतीराम पावरा सेंधवा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment