---Advertisement---

दुर्दैवी : विजेच्या धक्का लागून तरुणाचा मृत्यू

by team

---Advertisement---

जळगाव  :  एका तरुणाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू ओढवल्याची दुर्दैवी घटना रविवार, १५  रोजी सकाळी १०  वाजता घडली.  याबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यामध्ये  नोंद करण्याचे काम सुरु होते.समाधान भागवत पाटील (२९, रा. पथराड, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

समाधान पाटील हे पाथराड येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. ते जैन कंपनीत कामाला आहेत. रविवारी सकाळी पाथराड येथे त्यांच्या घराशेजारी मित्रासोबत विद्युत बोर्डाचे काम करीत होते.  परंतु, त्याच वेळी त्यांना विजेचा धक्का लागल्याने ते दूर फेकेल गेले. ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.  यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.  समाधान यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.  घटनेबद्दल पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, समाधान याच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---