---Advertisement---
अडावद ता. चोपडा : येथील शेतशिवारात असलेल्या वटार ता. चोपडा फिडरवर शेतशिवारात मेन लाईनवर काम करित असलेल्या झिरो वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत वीज कंपनीच्या पाच जणांविरुध्द अडावद पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहीती अशी की आज दि. ६ रोजी आडगाव ता. चोपडा येथील दिलीप मोतीराम बारेला (वय २८) हे वटार फिडरवर मेन लाईन काम करित असताना वीजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. सदर बाबतीत सुरेश मोतीराम बारेला यांच्या फिर्यादीवरुन वीज कंपनीचे अभियंता सचिन केदारे यांच्यासह रमेेश पवार, सुमित चौधरी, योगेश पाटील, साळुंके अशा पाच जणांवर अडावद पो. स्टे ला ३०४अ, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राजू थोरात, हे.काँ. उमेश भालेराव हे करित आहेत.