शेतातून काम करून घराकडे निघालेल्या सात महिलांना भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पाच महिला जागीच ठार, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या भयंकर अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आयशरमध्ये दोघेजण होते, त्यातील एक पळून गेला, तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले.
शेतातील काम करून, घरी परतणासाठी गाडीची वाट पाहत असलेल्या सात महिलांना कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील बंडगरवाडी येथे आज दुपारी चार वाजता हा भीषण अपघात झाला.
या सर्व महिला कटफळ गावच्या असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या पुण्यात गेल्या महिन्याभरात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.नागपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी एका कारणे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले होते. या सर्व प्रकरणांमुळे राज्यातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.