सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कर्नाटक निवडणुकीवरील प्रतिक्रियेवर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे ‘शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. हे अभियान मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात राबविण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे घर जळत आहे त्याकडे लक्ष द्यावे. ते कसे वाचेल याकडे बघावे. दुसऱ्याचे घर जळत आहे, यात कसला आनंद व्यक्त करता असा मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्यांनी बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगवीला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळे दिवाने झालेत असेही शिंदेंनी यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदी मान्यवर उपस्थित हाेते.
दुसऱ्याचे घर जळत असताना कसला आनंद व्यक्त करता : मुख्यमंत्र्यांचा टोला
by team
Published On: मे 13, 2023 5:33 pm

---Advertisement---