देवीच्या दर्शनाला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यू… खासदार डॉ. हिना गावितांनी घेतली धाव

 

नंदुरबार : देवमोगरा येथे देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला  अॅक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे १७ भाविक जखमी झाले. याबाबत खासदार डॉ. हिना गावित यांना कळताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्तांची आस्थेवाईक चौकशी केली. एवढेच नव्हे तर जातीने उपस्थित राहून रुग्णसेवेला गती दिली.

शिरपूर तालुक्यातील भाविक आदिवासींची दैवत देवमोगरा मातेच्या दर्शनाला गेले, तेथून परतत असताना वाहनाला  अॅक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला.  हा अपघात अक्कलकुवा रस्त्यावर खापर ते उदापूर गावादरम्यान सायंकाळी घडला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे १७ भाविक जखमी झाले. याबाबत खासदार डॉ. हिना गावित यांना कळताच त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेत अपघातग्रस्तांची आस्थेवाईक चौकशी केली. एवढेच नव्हे तर जातीने उपस्थित राहून रुग्णसेवेला गती दिली.  सलाईन लावली किंवा नाही, अस्थिभंग किती आणि कसा आहे, एक्स-रे काढले किंवा नाही, अशी सर्व चौकशी करित अपघातग्रस्त महिला आणि मुलांची त्यांनी संवाद केला.

मृत व जखमी बोराडी (ता. शिरपूर) येथील रामनगरचे रहिवासी आहेत. जखमींवर नंदुरबार व अक्कलकुवा येथे उपचार सुरू असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना कळतच खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची तातडीने भेट घेतली. अस्थेवायीक चौकशी करून त्यांच्या उपचार सेवेला गती दिली. भारतीय जनता पार्टीचे शिरपूर तालुका अध्यक्ष राहुल रंधे, डॉक्टर विक्रांत मोरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हुमणे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.