---Advertisement---

“देशद्रोही” आयुष्मान खुराणाला नेटकरी करत आहे प्रचंड ट्रोल

by team

---Advertisement---

आयुष्मान खुरानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयुष्मान एका कॉन्सर्टमध्ये ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेत्याने पाकिस्तानला दिल आणि जान म्हटलं आहे. तो नुकताच अयोध्येला जाऊन आला आहे. राम मंदिरातील प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान अभिनेता उपस्थित होता. पण आता तो एका वेगळ्याच चर्चेत आला आहे

अभिनेत्याने पाकिस्तानी गायक कैफीचं ‘दिल दिल पाकिस्तान’ हे गाणं गायल्यामुळे नेटकरी त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. पाकिस्तानी आपल्या सैनिकांना ठार मारत असताना दुसरीकडे आयुष्यान त्यांचं गाणं गात आहे, आपण या अभिनेत्याचे सिनेमे का पाहतो? या कलाकारांचा प्रामाणिकपणा कुठे आहे? पाकिस्तानचं कौतुक करणाऱ्या अभिनेत्याला राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण का दिलं? देशद्रोही, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर निशाणा साधला आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---