नागपूर : आयकर विभागाने दिवशीही माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे मारून झडती घेतली. आयकर विभागाने शुक्रवारी देशमुख यांच्या निवासस्थानी धाड घालून झडती घेतली होती. आज शनिवारी पुन्हा त्यांच्या निवासस्थानी व त्यांची साई शिक्षण संस्था, वर्धा मार्गावरील ट्रॅव्होटेल हॉटेल, मुलगा सलील देशमुख यांच्या घरी आणि देशमुख यांचे मित्र सागर भटेवरा यांच्या निवासस्थानी छापा मारला.
आयकर अधिकाऱ्यांसह केंद्रीय राखीव पोलिस बलाचे देखील होते. या काळात कुणालाही आत आणि बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. ईडी न्यायालयात बेकायदेशीर सावकारी प्रकरणात कित्येक वेळा समन्स बजावूनदेखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित झाले नसल्याने अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने या मुद्यावर न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने शुक्रवारी विशेष न्यायालयात याचिका दाखल करून भांदविच्या कलम १७४ अन्वये देशमुख यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे.