शिर्डी: उबाठा गट शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उबाठा गटाकडून जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी देशाचा पुढचा अर्थसंकल्प मीच मांडणार असं वक्तव्य उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
यावेळी संजय राऊत शिर्डीतून एका हॉटेलमधून बाहेर पडताना पत्रकारांना त्यांच्या हातात एक बॅग दिसली. यावेळी पत्रकारांनी त्यांनी साहेब ही अर्थसंकल्पाची बॅग वाटली असं म्हटलं. यावर संजय राऊत म्हणाले की, “देशाचा पुढला अर्थसंकल्प मलाच मांडायचा आहे. बघा तुम्ही.” त्यांच्या या वक्तव्याने तिथे एकच हशा पिकला. संजय राऊतांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.