पनवेल : पनवेलमधील टॉवरवाडी या आदिवासी पाड्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आणि वीस वर्षीय युवकाने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचललं. याप्रकणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल मधील टॉवरवाडी परिसरातील आदिवासी पाड्यामधील सदर मुलगी व युवक आहे. मुलगी 16 वर्षाची आणि युवक 20 वर्षाचा असून, ते दोघेही दोन दिवसांपासून बेपत्ता होते. दरम्यान आज गावा शेजारील जंगलात ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्यांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. या विरोधातूनच दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.