कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
पुणे : राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागांत १०० टक्के आणि उर्वरित भागांत साधारणपणे ९५ ते ९८ टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले.
जून-जुलै महिन्यात ओढ देणार आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला बरसणार
कालावधी व तापमान कमी – आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, – पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठा खंड राहण्याची शक्यता असून, दापोली,नागपूर, निफाड, सोलापूर, जळगाव व – परभणी येथे खंडाचा कालावधी कमी
दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात
* दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता, तो आता पुढे सरकला आहे. रविवारी मान्सूनने तामिळनाडू, कर्नाटकचा काही भाग, आंध्र प्रदेशचा काही भाग आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये शिरकाव केला आहे.
* येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच राज्यातील विदर्भामधील तापमान किंचित कमी झाले असून, अनेक भागांत पावसाचा अंदाज दिला आहे.
* यंदा वेळेआधीच मान्सून दाखल झाला. केरळमध्ये दोन ● दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून पुढे रविवारी मान्सूनने मोठी वाटचाल केली आहे. बराच भाग त्याने व्यापला असून, त्याचा पुढील प्रवासही वेगाने होईल.
शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यावर पेरणी करावी.
कोकणात अधिक पाऊस असल्याने भाताचे उत्पादन चांगले होईल, पण मराठवाड्यात कमी पाऊस असल्याने कमी पाण्यात होणारी पिके लावावीत. कमी पाण्यातही चांगले उत्पन्न
देतील, अशा पिकांचे वाण तयार करणे आवश्यक आहे. – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ