मुंबई : आगामी चार ते पाच दिवसांम ध्ये लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन देशात आचारसंहिता लागू होणार असल्याने, राज्य सरकारने निर्णयांचा धडाका सुरू केला असून, अवघ्या दोन दिवसांत २६९ शासन निर्णय जाहीर केले आहेत. ६ आणि ७ रोजी अनेक महत्त्वाच्या कामांचे राजपत्रित आदेश सरकारने जाहीर केले आहेत. यात पदस्थापना, जल प्रकल्प, कोकणातील कामे, निधींची पूर्तता अशा निर्णयाचा समावेश आहे. ६ मार्चला ९६ शासन आणि ७ मार्च रोजी १७३ शासन निर्णय जारी करण्यात आले.
निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास सर्व कामे ठप्प होतील. त्यातच ८, ९ आणि १० मार्चला सलग तीन दिवस सुट्या आल्याने ६ आणि ७ मार्च रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.यात प्रामुख्याने निधीचे वितरण, राज्य उत्पादन शुल्क यासारख्या महत्त्वाच्या विभागातील पदस्थापना, कोकणातील काही योजनांना म ान्यता देण्यासंदर्भातील निर्णयांचा समावेश आहे. दरम्यान, सोम वार आणि मंगळवार असे दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेतली जाण्याचीही अपेक्षा आहे.