तरुण भारत लाईव्ह । १९ सप्टेंबर २०२३। अपघाताची मालिका सुरूच असून त्याचतच मुक्ताईनगर मधून एका अपघाताची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुक्ताईनगरच्या महामार्गावर समशानभूमी जवळ आज अपघात झाला. मोटारसायकल ची समोरासमोर धडक होऊन दोन जण जागीच ठार झाले असून दोन जण गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना दवाखान्यात नेण्याची सोय केली. मृत झालेले दोघे जण हे मुक्ताईनगर तालुक्यातील पूरनाड येथील राहणारे होते. या अपघातात मृत झालेल्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. यानंतर या अपघातामुळे पुन्हा महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.