---Advertisement---

धक्कदायक! नात्याला काळिमा फासणारी घटना, भावाने केला बहिणीवरती अत्याचार

by team
---Advertisement---

संभाजी नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे नात्याला काळिमा फासली गेली आहे.सख्ख्या भावासह नात्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.पीडित मुलगी ही गर्भवती राहिल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.आरोपी भावाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर गंगापूर शहरातील पीडितेच्या सख्ख्या भावाने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत शेतात व राहत असलेल्या घरी वेळोवेळी अत्याचार केला. तसेच, ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेला पोहेकॉ सुभाष होनाजी गांगुर्डे याने देखील नात्यातील या अल्पवयीन मुलीवर तिच्या राहत्या घरी, घरात कोणी नसताना सहा महिन्यांपूर्वी बलात्कार केला.

त्यामुळे, या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून तिचा सख्खा भाऊ तसेच नातेवाईक पोहेकॉ. सुभाष होनाजी गांगुर्डे विरोधात पॉक्सो व विविध कलमांतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलगी ही गर्भवती असल्याने तिला धक्का बसला व तिने पोलिसात गुन्हा दाखल केला, गुन्हा दाखल होणार हे कळताच पीडितेच्या आरोपी भावाने शहरातून पळ काढला.पण पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.सोबतच यातील दुसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment