पाचोरा : येथील बी. ओ. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली. ३१ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास या टाकीतील पाण्याला वास येत असल्याचे शाळेतील सुरक्षा रक्षक प्रशांत गरुड यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी मुख्याध्यापक अतुल बापूराव ठोके यांना फोनवरून माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक ठोके यांनीही शाळेत धाव घेतली. त्यांनी शाळेत जाऊन टाकीतील पाण्याची पाहणी केली असता पाण्यावर पांढऱ्या रंगाचा तवंग दिसून आला व पाण्याला वास येत असत्याचे जाणवले. टाकीजवळ एक पांढऱ्या रंगाची विषारी बाटली ही आढळून आली.
या वरून अज्ञाताने शाळेतील विद्यार्थ्यांना धोका निर्माण होईल, असे गैरकृत्य केल्याचे मुख्याध्यापक ठोके यांच्या निदर्शनास आले.याप्रकरणी मुख्याध्यापक ठोके यांनी पाचोरा पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दोन संशयित अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असून पाण्याचे सॅम्पल हे नासिक येथील लॅबला पाठविण्यात आले आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या म पाण्याच्या ार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत पाटील करीत आहे