धक्कादायक! आंबे पिकविण्यासाठी चक्क पावडरचा वापर, नागरिकांच्या जीवाशी खेळ

धुळे : बाजारात येण्याआधी कच्चा आंबा झटपट पिकावा, पिवळसर दिसून ग्राहकांच्या पसंतीस उतरावा म्हणून आंबे पिकविण्यासाठी बंदी असलेल्या आरोग्यास अपायकारक कॅल्शियम कार्बाइडचा वापर होत आहे. यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करताना ते कृत्रिमरित्या पिकविलेले आहेत किंवा कसे हे लवकर लक्षात येत नाही.

याची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे. सद्यःस्थितीत आंब्याचा हंगाम सुरू झाल्यामुळे बाजारात आंबे विक्रेत्यांची गर्दी पहायला मिळत आहे. जो तो आपल्याकडील आंबे अधिक चांगले असल्याचा दावा करत आहे. हापूस, केशरच्या नावाखाली ग्राहकांची सर्रास लुट सुरू आहे. बाजारात विक्रीस येत असलेले आंबे बंदी असलेल्या कॅल्शियम कार्बाइड घटकाचा वापर करून पिकविले जात आहे. बहुतांश व्यापाऱ्यांकडे रायपिंग चेंबरची सुविधा नाही. त्यामुळे परराज्यातून आंबे आणतानाच ट्रान्सपोर्टव्या ट्रकमध्ये कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवल्या जातात. दोन-तीन दिवसांच्या प्रवासात

कार्बाइडच्या परिणामामुळे कच्चे आंबे पिवळे होऊन पिकल्याचे भासतात. आंबा ट्रकमधून उतरवताना कार्बाइडच्या पुड्या काढून टाकल्या जातात. या प्रकाराकडे अन्न-औषध प्रशासनाने लक्ष देणे उ आवश्यक आहे. परंतु या स्वरुपाच्या कारवाईसाठी अद्याप कुठेही तपासणी झाल्याचे ऐकीवात नाही.

आंबे विक्रेत्यांना साध्या सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत. कार्बाइड घटकापासून पिकवलेला आंबा खाण्यात आल्याने अनेकांना उलटी, मळमळ होणे, अशी लक्षणे जाणवतात. यामुळे कार्बाइडच्या द वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अधिक श नफा मिळविण्यासाठी ग्राहकांच्या जिवाशी खेळ ख सुरू आहे. याची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेण्याची मागणी होत आहे