भुसावळ : महिलांवरील अत्याचार हे वाढतच आहे ही चिंतेची बाबा असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अश्यातच भुसावळ शहरात एका महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील दर्डा कॉलनी परिसरातील एका भागात २५ वर्षीय महिला ही आपल्या मुलांसह वास्तव्याला आहे.आरोपी सुरेश त्र्यंबक पाटील रा. कांचन नगर, जळगाव याने महिलेला आमिष केला महिलेला घर खर्चासाठी, कपडे घेण्यासाठी पैसे देतो आणि मुलांना चांगल्या शाळेत शिकविण्याचे आमिष दाखवत महिलेवर सप्टेंबर २०२३ मध्ये अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत महिलेने रविवारी २८ जानेवारी रोजी रात्री १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार महिलेच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुरेश त्र्यंबक पाटील रा. कांचन नगर, जळगाव याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेडकोळी हे करीत आहे.