धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यात आठ महिन्यात १२५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, मात्र…

जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात १२५ च्यावर शेतकयांनी बेमोसमी पाऊस, अल्प उत्पन्न आदी नैसर्गिक तसेच अन्य कारणामुळे आत्महत्या केल्या आहेत. मात्र शासनाकडे ११२ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद आहेत.

तीन वर्षापूर्वी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात अतीवृष्टी सरासरीपेक्षा जास्त तसेच गत २०२३ च्या हंगामात कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे नापिकी, कर्जबाजारीपणा आदी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्या नाहीत. तर मिळालेल्या माहितीनुसार शासन दप्तरी दरदिवशी सरासरी दोन ते तीन शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात.

विविध कारणांमुळे आत्महत्या
जिल्ह्यात पाच वर्षापूर्वी अवर्षण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. अनियमित आणि सरासरीपेक्षा कमी अधिक पावसाम ळे शेतीचे उत्पन्न देखील अनियमित असून वाढती मजूरी, मशागत खर्च, महागडे बी बीयाणे, व शेवटी हाती येणारे अल्प उत्पन्नासह अत्यंत कमी बाजारभाव यामुळे शेती करणे तोठ्यात जात आहे.

जिल्ह्यात आठ महिन्यांमध्ये १२५ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा अखेरचा पर्याय निवडला असून मागील काही वर्षांपासून सुरु असलेले आत्महत्येचे सत्र यावर्षी देखील सुरुच असत्याचे दिसत आहे. जिल्हा प्रशासनाकडे ११२ शेतकयांनी आत्महत्या केल्याची नोंद असून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांकडून सादर झालेल्या मदत प्रस्तावावरून दिसून आले आहे.

५० मदत प्रस्तावांना मान्यता
गेल्या आठ महिन्यात जानेवारी १२, फेब्रुवारी १८, मार्च १४, एप्रिल १८, मे १४. जून १२, जुलै १४, ऑगस्ट, १० अशा ११२ शेतकरी आत्महत्यांची नोंद पोलीस प्रशासन, तलाठी, मंडळ वा पोलीस पाटील स्तरावरून करण्यात आली आहे. यात जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीकडे आठ महिन्यात ११२ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांकडून मदत अनुदानाचे प्रस्ताव सादर झाले आहेत. त्यापैकी तलाठी, पोलीस पाटील, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत स्तरावरून झालेल्या पंचनामा नोंदी व योग्य अहवालानुसार ५० मदत प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. तर पात्र वा माहिती सविस्तर नोंदी नसल्याने फेरपडताळणी चौकशी आदी कारणामुळे २६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. अपूर्ण माहिती वा संयुक्तीक योग्य कारणांअभावी ३६ मदत प्रस्ताव अपात्रतेमुळे फेटाळण्यात आले आहेत.

सर्वात जास्त आत्महत्या
फेब्रुवारी, एप्रिल महिन्यात शेतकरी आत्महत्येची संख्या सर्वात जास्त फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि जुलै अशी असून बँक कर्ज परतावा वा त्याच दिवसात शेतकऱ्यांच्या हाती नवीन हंगामासाठी पूर्वतयारीसाठी पैसा शिल्लक नसल्यामुळे देखील शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जात असत्याचे दिसून येत आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीसाठी प्रयत्न
अल्प उत्पन्न, कर्जबाजारीपणा या विवंचनेत होणारी शेतकरी आत्महत्या हा विषय अत्यंत गंभीर आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी प्रबोधनपर मेळावे घेतले जात आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना जिल्हा प्रशासनाकडून १ लाख रूपये मदत अनुदानाव्दारे सर्वतोपरी मदतीचे प्रयत्न केले जात असून कुटुंबांतील महिला सदस्यांना आथीक स्वयंपूर्णतेसाठी प्रशासन तसेच उमेद खासगी संस्थाच्या माध्यमातूनदेखील पिठाची गिरणी वा अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.