जामनेर : वडिलांनी पैसे न दिल्याने मुलाने धारदार शस्त्राने वडिलांच्या गळ्यावर वार करुन त्यांना ठार मारले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना गुरुवारी दुपारी पळासखेडे बुद्रुक ता.जामनेर येथे घडली. बाजीराव राजाराम पवार असे मृत इसमाचे नाव आहे. घटना घडली त्यावेळी घरात कुणीही नव्हते. त्यावेळी मुलगा सुमित बाजीराव पवार याने वडिलांकडे पैसे मागितले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला आणि सुमित याने रागाच्या भरात वडीलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला.
जळगाव जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील चित्त थरारक घटना समोर आली आहे मुलगा सुमित बाजीराव पवार याने वडिलांना मयत बाजीराव राजाराम पवार यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितल्याने मुलगा व वडिलांमध्ये वाद झाला यामध्ये मुलाचे राग अनावरण झाल्याने मुलाने वडीलांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली.
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत मयत बाजीराव राजाराम पवार याचे मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ग्रामस्थांच्या मदतीने देण्यात आले मृतदेह नेत असताना मुलगा सुमित देखील सोबत होता या सर्व घटनेची माहितीची कबुली संशयित आरोपी सुमित राजाराम पवार याने पोलिसांना दिली या घटनेमुळे पळासखेडा गावांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहे