भुसावळ : कत्तलीच्या उद्देशाने गायींची वाहतूक करणारे दोन ट्रकसतर्क गो प्रेमींनी भुसावळात अडवत २५ गार्गीना जीवदान दिले तर दाटीवाटीने झालेल्या वाहतुकीमुळे दोन गार्गीसह एका वासराचामृत्यू ओढवला. हा प्रकार सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास यावल नाक्यावर उघडकीस आला. याप्रकरणी रात्री उशिरा पंजाब राज्यातील चालकांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
पंजाब राज्यातून गार्गीची अत्यंत निर्दयतेने व कुरतेने दोन ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक होत असल्याची माहिती यावल तालुक्यातील गो प्रेमींना मिळाल्यानंतर त्यांनी ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकांनी त्यांना हुलकावणी देत ट्रक सुसाट वेगाने भुसावळच्या दिशेने दामटला मात्र ही बाब भुसावळातील गो प्रेर्मीना कळवण्यात आल्यानंतर यावल नाक्यावर दोन ट्रक गो प्रेर्मीच्या उपस्थितीत अडवण्यात आल्या.
शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनी दोन ट्रकची पाहणी केली असता अत्यंत दाटीवाटीने व निर्दयतेनेवाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले. ट्रकमध्ये गुरांसाठी कुठलीही चारा-पाण्याची व्यवस्था नसल्याने दोन्ही ट्रक अकलूद येथील आसाराम बापूजी आश्रमात नेण्यात आल्या.
यावेळी गुरांची चारा-पाण्याची तसेच उपचाराची व्यवस्था करण्यात आली. संशयीतांनी गायी पालनासाठी नेत असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्ष पाहणीत गुरांची चारा-पाण्याची व्यवस्था दिसून आली नाही. कुरतेने गुरांची वाहतूक केल्यानंतर दोन गार्गीसह एका वासराचा गुदमरल्याने मृत्यू झाल्याने त्यांची विल्हेवाट गो प्रेमींच्या मदतीने लावण्यात आली. पंजाब प्रांतातून २२ एप्रिलपासून ही वाहने निघाल्याचे समजते.