विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांनी एका महिला रुग्णाच्या पोटातून २४ आठवड्यांचा ‘स्टोन बेबी’ यशस्वीरित्या काढण्यात आला. याला ‘लिथोपेडिअन’ म्हणून ओळखले जाते, ही एक दुर्मिळ घटना आहे जी सामान्यतः गर्भधारणेदरम्यान पोटातील गर्भ मरण पावते तेव्हा उद्भवते. लिथोपीडियाची स्थिती गर्भधारणेच्या १४ आठवड्यांपासून पूर्ण मुदतीच्या गर्भधारणेपर्यंत होऊ शकते. हि घटना विशाखापट्टणमच्या अनकापल्ले जिल्ह्यातील २७ वर्षीय रुग्णासोबत घडली, जी दोन मुलांची आई आहे. महिलेला पोटात तीव्र वेदना होत होत्या त्यामुळे ती ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात KGH ला पोहोचली, त्यानंतर तिच्या पोटात ‘स्टोन बेबी’ असल्याचे आढळून आले.
केजीएच येथील प्रसूतीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. वाणी यांनी एमआरआय स्कॅन केले, ज्यात तिच्या पोटात ‘स्टोन बेबी’ असल्याचे दिसून आले. stone baby was in stomach वैद्यकीय पथकाने ३१ ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया केली. ऑपरेशन यशस्वी झाले असून महिला बरी होत आहे. यापूर्वी एस्टेला मेलंडेझ या महिलेलाही अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. ६० वर्षांहून अधिक काळ तिच्या गर्भाशयात ‘स्टोन बेबी’ आहे हे तिला माहीत नव्हते.