धक्कादायक ! मोबाईलच्या स्फोटात चिमुकल्यांनी गमावला जीव…

होळीपूर्वी उत्तर प्रदेशात एका घरात एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार मुलांनी  आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी पल्लवपुरम पोलीस स्टेशन हद्दीतील जनता कॉलनीत  ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना ज्या खोलीत घडली, तिथे एक इलेक्ट्रिकल बोर्ड होता आणि मोबाईल चार्जिंगला होता. मोबाईल चार्जिंगला असताना अचानक त्याचा स्फोट झाला. मोबाईलच्या स्फोटामुळे शेजारील  बेडवरील फोमच्या गादीनं पेट घेतला आणि आग लागली. पाहता पाहता आग संपूर्ण खोलीत पसरली.

नेमकं काय घडलं?
खोलीत आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब होतं. पती-पत्नी आणि त्यांची मुलं असे सहाजण खोलीत होते. पती-पत्नीनं आपल्या मुलांसह जीव वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. आग संपूर्ण खोलीत पसरली होती. घरातील सर्वचजण होरपळून निघाले. आगीची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी धाव घेत, घरातील सर्वांना बाहेर काढलं. त्यांना तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना मेरठच्या, लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं.

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील रहिवाशी असलेल्या जॉनीचं संपूर्ण कुटुंब जनता कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होतं. जॉनी हा रोजंदारीवर काम करतो. होळीखोलीत त्याची मुलगी सारिका (10), निहारिक (8), मुलगा गोलू (6) आणि मुलगा कालू (5) खेळत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान निहारिक आणि कालू या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार सुरू होते. त्यानंतर पहाटे आगीत होरपळून निघालेल्या इतर दोन मुलांनीही आपला जीव सोडला. तर मुलांचे आई-वडीलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.