कानपुर : धर्म परिवर्तनाचा धक्कादायक प्रकार उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये समोर आला आहे. शंभरवर हिंदू नागरिकांना महिन्याला ५० हजार रुपयांचे आमिष देऊन खिश्चन धर्म स्वीकारण्याचा डाव आखण्यात आला होता. त्यासाठी त्यांना उन्नाव येथील एका चर्चमध्ये नेण्यात येत होते. मात्र, अनर्थ होण्याआधीच पोलिस पोहोचले आणि धमारतरणाचा डाव उधळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कानपूर जिल्ह्यातील शंभरवर हिंदू नागरिकांचे सम पदेशन करून त्यांना खिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी बाध्य करण्यात आले. यासाठी त्यांना दर महिन्याला ५० हजार रुपये मि ळणार असल्याचे सांगण्यात आले होते. सवारना बसमध्ये बसवून उन्नाव येथील चर्चमध्ये नेले जात होते. तिथे सवारचे धमारतर केले जाणार होते. नवाबगंज पोलिस ठाण्यात एकाने फोन करून याची माहिती दिली.
याची दखल घेत पोलिसांचे दोन पथक पाठवण्यात आले. गंगा बॅरेज `त्रातून दोन बसेस उन्नावच्या दिशेने जात असताना त्यांना थांबवण्यात आले. पोलिसांनी बसमधील नागरिकांची चौकशी केली असता धर्मपरिवर्तनाचा प्रकार समोर आला