धक्कादायक! ४०० फुट खोल दरीत उडी घेत, प्रेमी युगलांने संपवले जीवन

नाशिक: जिल्ह्यामधील सप्तश्रृंगी गडावरून उडी घेऊन  प्रेमीयुगलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुण व तरुणी हे एका आठवड्या पासून बेपत्ता होते,अश्यातच त्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली,   याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमीयुगलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांका संतोष तिडके आणि मंगेश राजाराम शिंदे या तरूण-तरूणीचे अशी नावे आहेत. त्यांनी ४०० फुट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे.

अखेर आठवडाभरांनंतर त्यांचा कुजलेला मृतदेह गडाच्या पायथ्याला असलेल्या गुराख्यांनी पाहिला असता पोलिस पाटील विजय चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ आढळलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.