धक्क्कादायक! देशात कोरोनाचे सापडले इतके रुग्ण

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचे रुग्ण अजूनही पूर्णपणे संपलेले नाहीत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाचे 312 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्गाच्या संख्येत ही वाढ ३१ मे नंतरची सर्वाधिक आहे. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या आता 1,296 वर पोहोचली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे एकूण 5,33,310 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोविड बाधितांची एकूण संख्या 4.50 कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या4,44,69,536 झाली आहे आणि राष्ट्रीय बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे. या प्रकरणात मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तेथील सरकारकडून रुग्णांचा डेटा मागितला होता, ज्याचा अभ्यास केल्यानंतर असे म्हटले आहे की कोणताही असामान्य किंवा नवीन विषाणू आढळला नाही. चीनने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच कोविड-19 चे कडक निर्बंध हटवले होते. हिवाळ्याच्या आगमनाबरोबरच देशात श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. बीजिंग आणि लिओनिंग प्रांतासारख्या उत्तर भागात अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत.