धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली,एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच

मुंबई: धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गा बरोबरच नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करत धनगड म्हणजेच धनगर असून धनगर समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करणारी याचिका पुण्याचे भारत अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील तसेच महाराणी अहिल्या देवी समाज प्रबोधीनी मंचचे, ईश्वर ठोंबरे व पुरुशोत्तम धाखोले यांनी उच्च न्यायालयात केली होती

दरम्यान धनगर आरक्षणाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. राज्यातील संपूर्ण धनगर समाजाचे या निकालाकडे लक्ष लागले होते, दरम्यान याचिका फेटाळल्याने हा धनगर समाजासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जस्टीस पटेल आणि जस्टीस कमल खटा यांच्या खंडपीठाने निर्णय दिला आहे की, अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.